नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या ओमायक्रॉनच्या प्रसाराचा आढावा घेतला. या बैठकीला तज्ज्ञ आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या सुरू असणाऱ्या सणांच्या काळात राज्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
दरम्यान मध्य प्रदेश सरकारने रात्रीची संचारबंदी पुन्हा लावली आहे. यापुर्वी गुजरात सरकारनेही रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरच निर्बंध निश्चित करण्याच्या सुचना केंद्राने यापुर्वी दिल्या आहेत.