Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. यातील तिच्या गोपी बहू या पात्राला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. मात्र सध्या देवोलिनाची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. देवोलिनाचा मित्र अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लक्ष घालण्याची विनंती देवोलिनाने पोस्टद्वारे केली आहे. याशिवाय देवोलिनाने आपल्या मित्राचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.
देवोलीनाने ट्विटर अर्थात एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमीजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबात तो एकटाच होता. त्याच्या आईचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर वडीलांचे छात्र लहानपणीच हरपले. तो त्याच्या कुटुंबात एकटाच होता. मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. त्याच्या काही मित्रांशिवाय त्याच्या कुटुंबात त्याच्यासाठी लढा देणारे कोणीही उरले नाही. तो कोलकाता येथील रहिवासी होता.
My friend #Amarnathghosh was shot & killed in St louis academy neigbourhood, US on tuesday evening.
Only child in the family, mother died 3 years back. Father passed away during his childhood.
Well the reason , accused details everything are not revealed yet or perhaps no one…
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) March 1, 2024
देवोलीना पुढे लिहिते, “अमरनाथ उत्तम डान्सर होता आणि त्याठिकाणी तो पीएचडीचं शिक्षण पूर्ण करत होता. संध्याकाळी बाहेर फिरायला गेल्यावर एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सध्या अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात परत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. भारतीय दूतावासाने याप्रकरणी लक्ष द्यावे निदान आम्हा सगळ्यांना या हत्येमागचं कारण तरी समजलं पाहिजे.” असं देवोलीनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही घटना मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे.