मुंबई – 1773 साली “काका मला वाचवा”अश्या आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात”माझ्या पुतण्याला वाचवा”अश्याआर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवर आता मनसेने प्रतिक्रिया दिली आहे.
1773 साली “काका मला वाचवा”अश्या आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात”माझ्या पुतण्याला वाचवा”अश्याआर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 7, 2022
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याभेटी संदर्भात आता शरद पवार यांनी माहिती दिली की, संजय राऊत यांच्यावर कारवाईच्या मुद्यावर या भेटीत चर्चा झाली. यावरुन आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “दिल्लीत काल’माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा’ अशा आर्त हाका ऐकू आल्या” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, या भेटीनंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून या भेटवरून पवार यांच्यावर टीका केली जात आहे.