मुंबई – दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मिरवणुकीत औरंगजेबचे फोटो झळकवल्याप्रकरणी चार जणांवर भिंगार येथील कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहंमद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. दर्गादायरा), अफनान अदिल शेख उर्फ खडा (रा. वाबळे कॉलनी), शेख सरवर (रा. झेंडीगेट), जावेद शेख उर्फ गब्बर (रा. आशा टॉकीज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सध्या या घटनेवरून राज्यातील राजकारण तापत चाललं असून, अनेक राजकीय नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना जिथे औरंग्याला गाडलंय तिथेच गाडावे लागेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 7, 2023
अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याबद्द निषेध देखील नोंदवला आहे. मात्र, आता या मुद्द्यामध्ये मनसेने देखील उडी घेतल्याचं दिसून आलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. “ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना जिथे औरंग्याला गाडलंय तिथेच गाडावे लागेल…’ असं इशारा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिलाय.