मुंबई – मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी सोमवारी(23 मे) ट्विटच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला होता. एक फोटो शेअर करत “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है.” असे ते अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. या फोटोंमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह दिसत आहेत. यावरून राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी सिंह यांना शरद पवारांनीच रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
या पार्श्वभूमीवर मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून राजकारण रंगलेलं असताना अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांना आणि मनसेला टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.
मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2022
पुढे रोहित पवारांनी म्हटले आहे की, राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत… मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.