पुणे – मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करणारे वसंत मोरे आता देखील एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. पुष्पा स्टाईलने केलेला हा वसंत मोरेंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं चांगलाच सुपरहिट झालं. त्या गाण्यातील अल्लू अर्जुनची हटके स्टाईल देखील सर्वसामान्यांना चांगलीच आवडली. आता त्याचा स्टाईलने मनसे नी वसंत मोरे यांनी ठेका ठेका धरला आहे. मोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तिफण व्हायरल होतोय.
अंगात हुडी जॅकेटडोळ्यांवर हिरवा गॉगल, एका हातात पुष्पा स्टाईल उपरणे घेऊन मोरे यांनी यावेळी थेट श्रीवल्ली वर भन्नाट डान्स केला आहे. अवघ्या चौदा सेकंदांचा हा व्हिडीओ असून मोरे समर्थक यावर भरभरून कमेंट देखील करत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये वसंत मोरे मनसेत नाराज असल्यामुळे जोरदार चर्चेत होते.मोरे हे सोशल मीडियावर जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच त्यांची हवा मनसे पक्षामध्ये देखील अनेकदा पाहायला मिळते. मोरे हे केवळ पुण्यापुरते मर्यादित असले तरी त्यांच्या नावाची चर्चा अनेकदा महाराष्ट्रभर होताना दिसते. पक्षातील नाराजीनानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आपली भूमिका देखील मांडली होती त्यानंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचं देखील बोललं जात होत.