मुंबई – इरफान खान आता या जगात नसला तरी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. या इरफान खानने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक कायमस्वरूपी आठवणी चाहत्यांच्या हृदयात कायम ठेवल्या आहे. त्यामुळे इरफानला मिस करणारे चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इरफानच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ रिलीज होणार आहे.
इरफान खानचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात याचा पुरावा हा ट्रेलर देतो. इरफानचा मुलगा बाबिल खानने त्याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि कॅप्शन लिहिले ,’प्यार, धोखा आणि एक गाणे… हॅशटॅगसह लिहिले,’द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’ यासोबतच बाबिलने सांगितले की, ‘उद्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. यासोबतच बाबिलने असेही सांगितले की, हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.’
ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून इरफानचे चाहते आजही त्याच्यावर किती प्रेम करतात हे सिद्ध होते. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतोय. हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक दिसत आहे.