मुंबई – राज्यात मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भोंग्यावरून केलेले विधान,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला, राष्ट्रवादीच्याआमदार अमोल मटकरींचे ब्राह्मण समाजावर केलेले विधान, नवनीत राणा याचं हनुमान चालीसा पठण – मातोश्री निवासस्थान, तर दुसरीकडे भारनियमन, कोळसा टंचाई, माजी खासदार राजू शेट्टीचें महाविकास आघाडीतून बाहेर पडणे, एसटी कर्मचाऱ्यांचा संप ,राष्ट्रवादीची संवाद, यात्रा असं काहीस चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.
यातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. येत्या १० जून रोजी आदित्य ठाकरे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जप्त. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.
तर शिवसेना पक्षप्रमुख यांच्या १४ मे रोजी होणाऱ्या सभेच्या टिझरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्षेप घेतला आहे. या टिझरमध्ये असलेली गर्दी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतील असल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे.
यावरून आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटरवर ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की ,’असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची…अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की…नकली हिंदुत्ववादी’ असं म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे.
तत्पूर्वी,आदित्य ठाकरे यांच्या अयोध्येत आगमनासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतील नयाघाट परिसरात शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्स आणि बॅनरमध्येही राज ठाकरेंना टोमणे मारण्यात आले आहेत. त्यात लिहिले आहे, ‘खरी येत आहे, खोट्यापासून सावधान!’ सध्या हे पोस्टर सोशलवर चांगलेच चर्चेत आले आहे.
मनसेचे नेते गजानन काळे यांचे ट्विट
असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची…अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की…नकली हिंदुत्ववादी pic.twitter.com/LVKtoq7e6t— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 11, 2022