नवी दिल्ली – ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने दिल्ली, मुंबईसह पाच मोठ्या शहरांमध्ये आपली सुपर डेली सेवा बंद केली आहे. सुपर डेली कंपनी दूध, किराणा सामानासह दैनंदिन गरजा पुरवते. सुपर डेली ही सबस्क्रिप्शन आधारित सेवा आहे.
सेवा का थांबली
स्विगीने सांगितले की, कंपनीने देशातील पाच प्रमुख शहरे, दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये आपली सेवा बंद केली आहे. यामागे सेवा तोट्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुपर डेलीने सांगितले की, या मोठ्या शहरांमध्ये आम्ही आमची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अद्याप फायदेशीर नाही.
5 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते
सुप्र डेली ही सबस्क्रिप्शन-आधारित वितरण सेवा आहे. म्हणजेच ही सेवा घेण्यासाठी ग्राहकांना त्याचे सदस्यत्व घ्यावे लागेल. यात 5 लाखांहून अधिक ग्राहकांचा मोठा आधार आहे आणि दररोज 2 लाखांहून अधिक ऑर्डर प्राप्त होतात.
पिक अँड ड्रॉप सेवा बंद
स्विगीने सांगितले की , त्यांनी काही शहरांमध्ये त्यांची “पिक अँड ड्रॉप” सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सर्व शहरांमध्ये स्विगी इन्स्टामार्टची सेवा सुरू राहणार आहे.