मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीला पार्ट्या करायलाही खूप आवडतात. जान्हवी अनेक तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसून आली आहे अभिनेत्रीचे अनेक वेळा पार्टीमधले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. असंच काहीसं पुन्हा एकदा पाहायला मिळालं असून यावेळी जान्हवी कपूरसोबत पार्टी करणाऱ्या एका व्यक्तीची बरीच चर्चा आहे.
View this post on Instagram
जान्हवीने तिच्या नाईट पार्टीच्या काही फोटोंचा कोलाज बनवला आहे आणि तो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती एका खास मित्राच्या अगदी जवळ दिसत आहे. अभिनेत्री बॅकलेस ड्रेसमध्ये त्या व्यक्तीच्या अगदीच जवळ दिसून येत आहे. दरम्यान फोटोमध्ये असणारा हा व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. जान्हवीसोबत दिसणार्या या व्यक्तीचे नाव ओरहान आहे. ओरहान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. शाहरुख खानची मुलगी सुहानापासून ते अजय देवगणची मुलगी न्यासापर्यंत ओरहानने पार्टी करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी कपूर ओरहानसोबत पार्टी करताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही ती आणि ओरहान अनेकदा खास अंदाजात एकत्र दिसले आहेत. याआधी दोघांनी मुंबईत एकत्र डान्स पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.