मनरेगा, ग्रामीण आवास योजनेच्या तरतुदीत अल्पशी घट 

नवी दिल्ली – केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या तरतुदीत 4.4 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, मनरेगा आणि पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेसाठीच्या तरतुदीत अल्पशी घट करण्यात आली आहे. ग्रामीण कल्याणकारी योजनांसाठी एकूण 1 लाख 17 हजार कोटी रूपये निधी उपलब्ध होईल. MNREGA, minor poverty reduction in rural housing scheme

रोजगार हमीशी निगडीत मनरेगासाठी यावेळी 60 हजार कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. मागील वेळी मनरेगासाठी 61 हजार कोटी रूपये उपलब्ध करण्यात आले होते. मागील वेळी 19 हजार 900 कोटी रूपये मिळालेल्या आवास योजनेसाठी यावेळी 19 हजार कोटी रूपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.