निवृत्तीच्या चर्चांवर धोनीचा मोठा खुलासा 

एजबॅस्टन – इंग्लंड आणि वेल्स येथे सुरू असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, धोनीने १४ जुलै म्हणजेच विश्‍वचषकाचा अंतिम सामन्यादिवशी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर धोनीने मोठा खुलासा केला आहे.

धोनीने म्हंटले कि, मी कधी निवृत्त होणार हे मलाच माहिती नाही. पण विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधीच मी निवृत्त व्हावे असे खूप लोकांना वाटते आहे, असे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, धोनीने विश्‍वचषकातील सात सामन्यांमध्ये 93च्या स्ट्राईक रेटने 223 धावा केल्या आहेत. धोनीने आतापर्यंत 348 वनडे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कले आहे. तर 90 कसोटी सामने आणि 98 टी-20 सामने खेळला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.