नगर – नगर जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यांना रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात या इंजेक्शनचा तुटवडा असून, रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयास या इंजेक्शनचा जास्तीत जास्त पुरवठा करण्यात यावा, असे गाऱ्हाणे आमदार संग्राम जगताप यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडले.
आ. जगताप यांनी आरोग्यमंत्री टोपे यांची आज भेट घेऊन नगरमधील रेमडेसिवीरच्या तुटवड्याने निर्माण