MLA Disqualification : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी नोंदवलेली जवळपास सर्वच निरीक्षण उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकामागून एक धक्का ठरत असल्याचे चित्र निकालाचे वाचन सुरु असताना दिसले.
मात्र निर्णयाच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दिलासा दिल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, एकनाथ शिंदे गटातर्फे उद्धव ठाकरे समर्थक १४ आमदारांच्या अपात्रतेची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या मागणीवर देखील विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा होता. मात्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाची ही याचिका फेटाळली. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तूर्तास तरी टळली आहे.
कारवाई टळली पुढे काय होणार?
ठाकरे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी खरा शिवसेना पक्ष शिंदेंचाच यावर शिक्कामोर्तब केलं असल्याने भविष्यात उद्धव ठाकरे गटातील आमदारांना देखील गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे.
त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाने कारवाई तूर्तास टळली असली तरी पुढे काय होणार हे पाहावे लागेल. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांसमोर नजीकच्या भविष्यात अपात्रता की ठाकरेंसोबत कायम राहायचं असा प्रश्न उभा ठाकणार आहे.
Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Aamdar Apatrata Prakaran | Vidhansabha Adhyaksha | MLA Disqualification | Live | Rahul Narvekar |