आमदार भरणेंनी इंदापूर शहर काढले पिंजून

मतदारांच्या गाठीभेटी घेत केली विचारपूस : नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेडा – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहर पिंजून काढले. जवळपास 24 ठिकाणी मुख्य प्रभागाच्या मध्यवर्ती भागात मतदारांशी संवाद साधत भेटी दिल्या. यावेळी शहरातील हजारो मतदारांनी आमदार भरणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

सरस्वतीनगर, बारामती रोड, जावईवाडी, दत्त नगर, महात्मा फुले नगर, दत्तमंदिर, सोनाई नगर देवीचामाळ, वडर गल्ली, अंबिकानगर, सावतामाळी नगर, रोहिदास नगर, पोरा पोरांची चावडी, संभाजी चौक, नामदेव मंदिर, चाळीस फुटी रोड, साईनगर, बाजारतळ व्यंकटेशनगर, या भागातील मतदारांच्या गाठीभेटी आमदार भरणे यांनी घेतल्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते बाळासाहेब ढवळे, अरबाज शेख, आरिफ शेख, अनिकेत वाघ, मुकुंद साळवी, विकास खिलारे, अशोक गणबोटे, सुधीर मखरे, प्रशांत शिताप, सोमनाथ पवार, राजू चौगुले, सौरभ शिंदे, राम शिंदे, मंगेश वाघमोडे, सुनील राऊत, उत्तम बंडगर, संजय गणबोटे, विकी परदेशी, प्रभु परदेशी, पोपट शिंदे,रमेश शिंदे, खाजाभाई बागवान,महादेव शिंदे, अविनाश मखरे, मुशीर पठाण, अशोक मखरे, मयूर ढावरे, दादासाहेब सोनवणे, स्वप्निल मखरे, विठ्ठल ननवरे, गजानन गवळी, सुरेश गवळी, श्रीधर बाब्रस, धनंजय बाब्रस, राकेश गणबोटे,धनंजय विंचू, श्रीकांत स्वामी, मिलिंद दोशी, प्रसन्न दूनाखे, मनोज पवार, संतोष ढोले, दिलीप वाघमारे, अमर गाडे, आयाज शेख, सोमनाथ शिंदे, निवास घोलप, विजय वाघमोडे, सागर पवार, प्रदीप राजपूत, बाळू धोत्रे, विकी वाल्मीक, आप्पा शिंदे, मच्छिंद्र कांबळे, साजन ढावरे, वसीम बागवान, संजय दोशी, समद सय्यद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संत रोहिदास नगर येथे आमदार भरणे यांचे स्वागत इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. रोहिदास नगरमधील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार भरणे यांनी भरीव निधी दिलेला आहे. संत रोहिदास मंदिरासाठी तब्बल 15 लाखांचा निधी कामे पार पडले आहेत व दहा लाखांचा निधी आणखी मिळणार असल्याने या मंदिराच्या विकासासाठी 25 लाख रुपये आमदार भरणे यांनी दिल्यामुळेच मंदिर परिसराचा कायापालट झाला असल्याने या नगरमधील मतदार आमदार भरणेंना पाठिंबा देतील, असा विश्‍वास विठ्ठल ननवरे यांनी व्यक्‍त केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.