इंदापूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना आमदार भरणे यांनी कुटुंबासमवेत गणपती (ganeshotsav) बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया.. या गजरात केली.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या सुविध पत्नी सारिका भरणे, श्रीराज भरणे व कुटुंबीय उपस्थित होते. “हे गणराया इंदापूर तालुक्यात धो धो पाऊस पडू दे,शेतकऱ्यांची पिके फुलू दे,दुष्काळ हटू दे..!’ अशी प्रार्थना आमदार दत्तात्रय भरणे यांनी गणरायाकडे गणरायाच्या स्थापनेनंतर केली.