बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत एक सकारात्मक दृष्टीकोन पसरवायचा आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आयुष्यभर हसत जगावे असे तिला वाटते. याशिवाय नवीन शिकण्यासाठी स्वत:ला कसे उत्साही ठेवते याबद्दल जॅकलीनने काही सल्ले दिले आहेत.
एका मुलाखतीत जॅकलीनने सांगितले की, आपला अतिरिक्त वेळ सोशल मीडियावर काही माइंडलेस स्क्रॉलिंग करण्यात घालवत असलेले आम्ही एकमेव प्राणी आहे. परंतु, सध्याच्या वातावरणात ते एक अतिशय विषारी आणि अस्थिर ठिकाण आहे. मला मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर ठाम विश्वास आहे पण असे बरेच लोक आहेत जे या व्यासपीठाचा दुरुपयोग करीत आहेत.
जॅकलिन म्हणाली, “मी माझ्या चाहत्यांशी शांतपणे संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. परंतु मी यावर जास्त वेळ वाया घालवित नाही. त्याऐवजी मी इतर ऍप्लिकेशन्सकडे माझे लक्ष वळविले आहे.
मी पुन्हा पिनट्रस्ट या ऍपवर लक्ष केंद्रित करत आहे. जे मी किशोरवयात मोठ्या उत्साहाने वापरले होते आणि जे मी आता माझ्या पात्रांसाठी आणि चित्रपटांसाठी मूड बोर्ड तयार करण्यासाठी वापरत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास यंदाच्या वर्षात जॅकलीनचे बॅक टू बॅक सॉन्ग रिलीज झाले आहेत.
याशिवाय “किक-2′ आणि ‘भूत पुलिस’ या चित्रपटांत ती काम करत आहे. तसेच जॅकलीनने पॉडकास्टसाठी अमांड सेर्नीसोबत हातमिळवणी केली असून ‘ऍक्शन अगेंस्ट हंगर फाउंडेशन’मध्ये ती भागेदारी करत आहे.