मुंबई, – शिवसनेने नोटीस पॅटर्न राबवायला सुरू केला असून राज्य शासनाप्रमाणे महापालिकेच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच अशा नोटिसींना भाजप भीक घालत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रवी राणा यांच्या घरी पाठवण्यात आलेल्या महापालिकेच्या नोटीशीनंतर ते बोलत होते. प्रवीण दरेकर म्हणाले, व्यक्तिगत स्तरावर कारवाई करण्याचे काम सूड भावनेने सुरू आहे. नारायण राणे, मोहीत कंबोज, रवी राणा यांना नोटीसा पाठवणाऱ्या महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होत असताना आम्हीही काही कमी नाही असे दाखवत या नोटीसा पाठवल्या जात आहेत. या सगळ्या नोटिसींना उत्तर दिले जाईल. कारण या सर्वांनी परवानगी घेऊन बाधकाम केले आहे.
तथापी त्रास द्यायचा, छळ करायचा आणि आपल्या हाती असलेल्या राज्य शासनाच्या यंत्रणा जशा आपण वापरतो, तशा महापालिकेच्या यंत्रणा वापरायच्या अशा प्रकारची रणनीती सुरू आहे. मात्र, भाजप त्याला भिकही घालत नाही, असा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.