मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश संकल्प सभेसाठी आज नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक येथील सटाणा ठिकाणून मुख्यमंत्र्यांची फेसबुक लाईव्ह सभा थेट नायजेरियातुन फेसबुकवर लाईव्ह दिसत होती. त्यामुळे विरोधकांनी संधी साधत भाजपला चिमटे काढले आहेत.
चुकी लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या टीमने फेसबुकवरील पोस्टमध्ये दुरुस्ती केली. मात्र या पोस्टचा स्क्रीन शॉट काढून राष्ट्रवादीने भाजपची खिल्ली उडवली आहे.
“एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित राहण्याचे चमत्कार मुख्यमंत्री दाखवू लागले की काय…आता नाशिक जिल्हा नायजेरियाला स्थलांतरित झाला की मुख्यमंत्र्यांची टीम नायजेरियातही भाजपाचा प्रचार करत आहे, हे मुख्यमंत्र्यांची कार्यक्षम टीमच सांगू जाणे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.