शिवसेनेच्या 28 नगरसेवकांचे राजिनामे

कल्याण : कल्याणमध्ये भाजपाने सेनेला एकही जागा न सोडल्याचे हादरे अद्याप बसत असून शिवसेनेच्या येथील 18 तर उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामे दिले. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत या कार्य कर्त्यांनी दिले आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेना बंडखोर उमेदवाराची भाजपापुढे डोकेदुखी असणार हे निश्‍चित झाले आहे.

पक्ष नेतृत्वाला अडचणीत आणायचे नाही, अशी भूमिका घेत या कार्यकर्त्यांनी नगर सेवक पदाचेच राजीनामे पक्षनेतृतकडे पाठवले आहेत. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. हा भाग खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या भावना संतप्त आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)