आप्पा येतोय बाप्पा सोबत! या टॅगलाइनसह काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे आणि भारत जाधव यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टरमध्ये पाटावर बसलेल्या भरत जाधव यांना सुबोधने उचलून घेतले आहे. या मजेशीर पोस्टरमुळे चित्रपटाविषयी सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती.
दरम्यान, आता ‘आप्पा आणि बाप्पा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला (शुक्रवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला असून, ट्रेलरला प्रेक्षकांची जोरदार दाद मिळत आहे. भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासह या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे अशी दमदार स्टारकास्ट आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे.
गरिमा प्रोडक्शन्स् ची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.