Mirabai Chanu set to miss Asian Championships – भारताची अव्लल महिला वेटलिफ्टर मिराबाई चानु हीने दुखापतीच्या कारणाने येत्या काळात होत असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. माजी विश्वविजेती चानू अजूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान झालेल्या हिप टेंडिनाइटिसच्या दुखापतीतून सावरत आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक मिळवलेल्या चानुने पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेमधून माघार घेतली आहे. मात्र थायलंड येथे होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.
चानु 49 किलो वजनी गटात सहभागी होते. मीराबाई चानू हिची ऑलिम्पिक पात्रता क्रमवारी चांगली आहे. ती दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी न झाल्याने तिचे नुकसान होणार नाही. मात्र, पॅरिसला पात्र ठरण्यासाठी खेळाडूंना काही स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक असते.
WTA Awards 2023 : इगाने पटकावला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार…
या खेळाडूंना 2023 सालातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, 2024 सालातील विश्वकरंडक स्पर्धा, 2023 व 2024 सालातील आंतरखंडीय स्पर्धा अशा काही स्पर्धांमध्ये चानुला खेळावेच लागणार आहे. त्यामुळे तीला लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावेच लागणार आहे.