मनामा – आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत जागतिक ज्युनियर विजेत्या आणि मराठमोळ्या मावळ तालुक्यातील हर्षदा गरुडने (HARSHADA GARUD) कांस्य पदकावर नाव कोरले. तिने 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचलत ही कामगिरी केली. आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताने जिंकलेले हे पहिले पदक आहे. या कामगिरीचे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.
🇮🇳’s 🏋️♀️ HARSHADA GARUD wins 🥉at the Asian Weightlifting Championships in Women’s 45kg category
She lifted a total of 152kg – 68kg in Snatch & 84kg in Clean & Jerk events to claim🥉
She also won 🥉in the Snatch event
Many congratulations Champ!#IndianAthletes
P.C: @iwfnet pic.twitter.com/xAvnXi2kyX
— SAI Media (@Media_SAI) October 9, 2022
आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या 68 वजनी गटात हर्षदाने स्नॅचमध्ये 68 किलोग्राम वजन उचलले. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 84 किलोग्राम वजन उचलले. हर्षदाने एकूण 152 किलो वजन उचलत कांस्यपदकावर कब्जा केला. व्हिएतनामच्या माय फुओंग खोंगने एकूण 166 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिने स्नॅचमध्ये 78 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 88 किलो वजन उचलले. तर इंडोनेशियाच्या सिती नफिसातुल हरिरोहने एकूण 162 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.
49 किलो वजनी गटात झिली दलाबेहेरा आणि ज्ञानेश्वरी यादव यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. माजी आशियाई चॅम्पियनशिप विजेत्या झिलीने (77 किलो + 94 किलो) वजन उचलले. तिसऱ्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात तिने 94 किलो वजन उचलले असते तर तिने कांस्यपदक जिंकले असते.
दुसरीकडे जागतिक ज्युनियर रौप्यपदक विजेत्या ज्ञानेश्वरीने स्नॅच (76 किलो) आणि क्लीन अँड जर्क (95 किलो) या दोन्ही प्रकारांमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. दरम्यान, या स्पर्धेसाठी भारताने 13 सदस्यीय संघ उतरवला आहे. ज्यात प्रामुख्याने कनिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे.