Iga Swiatek named WTA Player of the Year – पोलंडची अव्वल महिला टेनिसपटू इगा स्वेटेक हीने आपल्या कारकीर्दीत एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली. तीने यंदाच्या मोसमातील अफलातून खेळाच्या जोरावर डब्ल्युटीएचा वर्षातील सर्वोत्तम महिला टेनिसपटूचा पुरस्कार पटकावला.
तीने अमेरिकेची महान महिला टेनिसपटू सेरेनाविल्यम्सच्या सलग दोन वेळा हा पुरस्कार मिळवण्याच्या कामगिरीची बरोबरी केली. अर्थात २०१२ ते २०१५ या कालावधीत सेरेनाने हा पुरस्कार तीनवेळा तर एकूण कारकीर्दीत तब्बल सात वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.
आता इगाने तीच्या पुढील कारकीर्दीत आणखी एकदा हा पुरस्कार मिळवला तर ती सेरेनाची बरोबरीही करेल. इगाने यंदाच्या मोसमात आंतरराष्ट्रीय टेनिसमधील तब्बल सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. तीने यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धाही जिंकली होती. तसेच हे तीचे कारकीर्दीतील चौथे ग्रॅंडस्लॅम विजेतेपदही ठरले होते.
#INDvSA Test Series : जॅक कॅलिसने कोहलीचे केलं कौतुक; कसोटी मालिकेबाबत केली मोठी भविष्यवाणी…
या वर्षीच्या संपूर्ण मोसमात इगाने जीतक्या स्पर्धा खेळल्या त्यात तीचे ७९ सामन्यांतून ६८ विजय नोंदले गेले असून केवळ ११ सामने तीने गमावले आहेत.