मुंबई – घरगुती उपचार करण्याच्या नावाखाली तब्बल दोन महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुगली गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा परिसरात ही घटला घडली आहे.
तुळिंज पोलीसात या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.
अनेक ठिकाणी उपचार घेऊनही पाठदुखीचा त्रास कमी नसल्यामुळे शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडे घरगुती उपायास कुटुंबीयांनी पीडितेला पाठविले असता आरोपीने तब्बल दोन महिने घरी बोलावून अत्याचार केेले. त्यानंतर पीडित गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीसात तक्रार दाखल केली.