मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत 180 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.
त्यांचा अभिनयामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग हा प्रत्येक वयोगटातला आहे. त्यामुळे जेव्हा ते घराबाहेर पडतात त्यावेळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. त्यामुळे त्यांचा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्याभोवती बॉडीगार्ड्सचं सुरक्षा कडं असतं.
बिग बीचे बॉडीगार्ड त्यांच्या चाहत्यांना आवरून बच्चन यांना पुढे जायला वाट मोकळी करून देतात. आपण कधी विचार केला आहे का की या बॉडीगार्डला पगार किती असेल? जितेंद्र शिंदे हे सावलीसारखे अमिताभ बच्चन यांच्या सोबत नेहमी दिसून यायचे. शिंदे यांच्या पगाराबाबत एक मोठी माहिती समोर आली होती.
जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात. म्हणजे ते महिन्याला जवळपास 12 लाख रुपये इतका पगार घेत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, जितेंद्रची स्वत: ची सिक्युरिटी एजन्सीही आहे. पण बरेचदा तो स्वत: बच्चन यांच्यासोबत अनेक ठिकाणी जात असतो. बॉलिवूडमध्ये अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासोबतही बॉडीगार्ड असतात आणि त्यांनाही जबरदस्त पगार दिला जातो. सलमानचा बॉडीगार्ड शेरा सगळ्यांना परिचित आहेच.