बारामती- राज्य मंत्रीमंडळात धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी धनगर प्रबोधन संघातर्फे कऱण्यात आली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये महादेव जानकर व प्रा. राम शिंदे यांना मंत्री पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर डॉ. विकास महात्मे यांनाही राज्यसभेवर संधी मिळाली. आता, विद्यमान महाविकास आघाडी सरकारमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी संघाची मागणी आहे.
विधान परिषद सदस्य रामहरी रुपनवर, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे समाजाचे नेतृत्व करीत असून त्यांना मंत्री पद द्यावे, अशी मागणी संघाचे अध्यक्ष गोविंद देवकाते, गुलाबराव गावडे, रमेश कोकरे, चंद्रकांत शिंगाडे, नवनाथ मलगुंडे, तानाजी गोफणे आणि शेखर हुलगे यांनी केले आहे.