मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, आज उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, विधानसभेत उद्या बहुमत चाचणी होण्याचे सांगण्यात आले असून, आज राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra: Nationalist Congress Party (NCP) MLA Dilip Walse Patil appointed as Protem Speaker of the state assembly. pic.twitter.com/NMDtCUEo9y
— ANI (@ANI) November 29, 2019
दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती.