पुणे: कोथरुडमधील आनंदनगर परिसरातील पेठे ज्वेलर्समध्ये दोघा चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गोळीबार करत लाखो रुपयांचे दागिने लूटले. दुकानात ग्राहक असताना आणी भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला सुरवात केली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला असून पोलिसांची पथके गुन्हेगारांच्या मागावर रवाना झाली आहे. या घटनेत कोणीही जखमी मात्र झाले नाही.
कोथरूड परिसरात आंनदनगर भागात मुख्य चौकात पेठे जेवलर्स आहे. येथे ग्राहक असल्याचा बहाणा करत दोघे 4 वाजून 35 मिनिटांनी दुकानात घुसले. त्यांनी कंबरेला लावलेले पिस्तुल बाहेर काढून दुलनातील मालक आणि कामगारांना धमकावत दुकान लुटण्यास सुरवात केली. कामगारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता एकाने पिस्तूलमधून हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळीही झाडण्यात आली. दोघांनी येथून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.
दरम्यान चोरटे तेथून दुचाकीने चांदणी चौकाच्या दिशेने पसार झाले. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीचा मग सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे तातडीने हलवली आहेत. कोथरुड पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखेची काही पथकेही गुन्हेगारांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत.