लोणी काळभोर- एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील श्री विश्वदर्शन देवता मानवता मंदिराला कर्नाटकातील उडप्पी येथील तेजावर मठ्ठाचे ज्ञान-मठाधिपती ज्ञान ब्रम्ह ऋषी परमपूज्य श्री श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांनी भेट दिली. यावेळी मूर्तीचे पूजन करून त्यांनी दर्शन घेतले.
यावेळी थायलंड येथील बौद्धीसत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू डॉ. बुद्धचरण दास, एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, तुळशीराम कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव शिवशरण माळी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पुजेरी, प्रा. डी.पी. आपटे, डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. किशोर रवांदे आदी मान्यवर उपस्थित होते.