बेळगाव – कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत.या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
काय आहे जयंत पाटील यांचे ट्विट
कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 18, 2021