पणजी : भारतीय नौदलाचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे मिग-29 के लढाऊ विमान शनिवारी कोसळल्याची घटना समोर आली आहे. वैमानिकाने वेळीच विमानातून बाहेर उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली. विमानाला पक्षी धडकल्यामुळे इंजिनाला आग लागली आणि हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मढवाल यांनी माध्यमांना सांगितले.
A MiG-29K fighter aircraft crashed in Goa soon after it took off for a training mission, earlier today. Both the pilots managed to eject safely. The aircraft involved in the crash was a trainer version of the fighter jet. pic.twitter.com/nUdsyWx1qs
— ANI (@ANI) November 16, 2019
कॅप्टन एम शेवखंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव हे विमान उडवत होते. विमान हवेत असताना एक पक्षी इंजिनला धडकले आणि इंजिनाने पेट घेतल्याचे सांगण्यात येते. दोन्ही वैमानिक वेळीच पॅराशूटने विमानाबाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या दुर्घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.
वेर्णा एमआयडीसीजवळ हे विमान कोसळले. सुदैवाने निर्मनुष्य ठिकाणी हे विमान कोसळले. गेल्यावर्षी गोव्यातील विमानतळावरुन मिग-29 विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच रन-वेवरुन घसरले होते. त्यावेळी धावपट्टीचे नुकसान झाले होते. काही काळ विमानतळ बंद ठेवावे लागले होते. दरम्यान,1999 मध्ये कारगिल युद्धावेळी मिग-29 ने उल्लेखनीय कामगिरी केली होती.