दि पुना मर्चंट्स चेंबरची भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना सुचना….
पुणे(प्रतिनिधी) – भुसार बाजरातील व्यापाऱ्यांनी व्यापार करताना जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंट पध्दतीचा वापर करावा, असे आवाहन दि पुना मर्चंट्स चेंबरतर्फे करण्यात आलेले आहे. वाढत्या करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
गुळ-भुसार विभागात काही व्यापाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 19 मेपासून भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबरने घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी, बाजार समिती प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोमवारपासून (दि.25) बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल बोलत होते. त्यावेळी माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, जवाहरलाल बोथरा उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दुकानदाराने दुकनात थरमल गन ठेवणे, सॅनिटायझर ठेवणे, सोशल डिटन्स ठेवणे, प्रत्येकानेमास्क घालणे आवश्यक असल्याच्या सुचना चेंबरतर्फे देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येकाने दुकान उघडे ठेवलीच पाहिजेत, असे बंधन नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बाजार समितीकडूनही सुविधा देण्यात येणार असून, बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तील थरमलद्वारे तपासणी करून बाजारात प्रवेश देण्यात येणार आहे. वेळोवेळी मार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.