नवी दिल्ली – भारत आणि जपान सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये विशिष्ट कुशल कामगार संबंधित सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. या मंत्रालयाच्या अंतर्गत सुश्रुषा सेवा, इमारत स्वच्छता, साहित्य प्रक्रिया उद्योग; औद्योगिक यंत्रणा उत्पादन उद्योग, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माहितीशी संबंधित उद्योग, बांधकाम, जहाज बांधणी आणि जहाज-संबंधित उद्योग, वाहन देखभाल, विमान वाहतूक, लॉजिंग, शेती, मत्स्योद्योग, अन्न आणि शीतपेय उत्पादन उद्योग आणि अन्न सेवा उद्योग आदी चौदा क्षेत्रातील कुशल भारतीय कामगारांची जपानमध्ये नोकरीच्या संधीं उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
तांत्रिक इंटर्न प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जपान सरकार भारतातून जपानमध्ये उमेदवारांना आमंत्रित करत एमएसडीई आणि जपानच्या न्याय मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयांने 2017 च्या ऑक्टोबरमध्ये सहकार्य करारावर स्वाक्षरी केली होती. कौशल्य विकास क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय सहकार्यात लक्षणीय वाढ करण्याच्या उद्देशाने या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राज कुमार सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.