नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी यांना मानहानी खटल्यात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे राहुल गांधी हे नाव त्या नेत्यांच्या यादीत गेले आहे ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्यानंतर दोन वर्षांची शिक्षा झाली आहे.
राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी हे दोषी सिद्ध झाल्यानंतर खासदारकी रद्द झालेले काही पहिले खासदार नाहीत तर त्यांच्याही अगोदर अनेक नेत्यांना त्यांची पदे सोडावी लागली आहेत. यात काँग्रेसच्या रशीद मसूद, आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव, जेडीयूचे जगदीश शर्मा, एनसीपीचे मोहम्मद फैजल आणि डीएमकेचे टीएम सेल्वागणपती यांचा समावेश आहे. यामध्ये रशीद मसूद आणि सेल्वागणपती हे राज्यसभेचे सदस्य होते.
एवढंच नाही तर काँग्रेस असा एक पक्ष आहे ज्याचे एका पेक्षा जास्त सदस्य हे कायदेशीररित्या दोषी आढळल्यानंतर त्यांना त्यांचे सदस्यत्व गमवावे लागले आहे.
* या नेत्यांनी गमावली त्यांची खासदारकी….
* रशीद मसूद (राज्यसभा)
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य मसूद यांना ऑक्टोबर 2013 मध्ये अपात्र ठरवण्यात आले होते. त्यांच्यावर बेकायदेशीर एमबीबीएस जागा वाटप केल्याचा आरोप आणण्यात आला होता. त्यानुसार त्यांना या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली होती.
* लालू यादव (लोकसभा)
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि सारणचे खासदार लालू यादव यांना चारा घोटाळ्यात सीबीआयने दोषी ठरवत त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याच आधारावर लालूंना ऑक्टोबर 2013 मध्ये लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले होते.
* जगदीश शर्मा (लोकसभा)
बिहारमधील जेहानाबादचे जेडीयूचे खासदार जगदीश शर्मा यांना चारा घोटाळ्यात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये लालूंसोबत त्यांनाही सदस्यत्व गमवावे लागले होते.
* टीएम सेल्वागणपती (राज्यसभा)
द्रमुकचे राज्यसभा सदस्य टीएम सेल्वागणपती यांना स्मशान शेड घोटाळ्यात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 मध्ये त्यांनी शिक्षा सुनावण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. शिक्षेच्या सुनावणीनंतर त्यांना अपात्रही ठरवण्यात आले.
* मोहम्मद फैजल खान (लोकसभा)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार फैजल यांना हत्येप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनी नुकतेच 13 जानेवारी 2023 रोजी लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले.
* हे आहेत आमदारकी गमावलेले लोकप्रतिनिधी
* जे. जयललिता
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता (AIADMK) यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात 2017 मध्ये चार वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटी दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या देशाच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या, ज्यांना पदावर असताना अपात्र ठरवण्यात आले होते.
* आजम खान
समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेशच्या रामपूरचे आमदार आझम खान यांना 2019 मध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना यूपी विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते.
* कुलदीप सेंगर
फेब्रुवारी 2020 मध्ये, सेंगरला बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागले. सेंगर उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
* अब्दुल्ला आझम खान
2008 मध्ये आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान याला महामार्गावर आंदोलन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व गेले.
* अनिलकुमार साहनी
RJD आमदाराने 2012 मध्ये बनावट विमान तिकिटाच्या आधारे 23 लाखांचा प्रवास भत्ता वाढवला होता. त्यानुसर त्यांना 2022 मध्ये अपात्र ठरवण्यात आले होते.
* अनंत सिंग
बेकायदेशीर शस्त्रे घरी ठेवल्याबद्दल बिहारच्या RJD आमदार अनंत सिंग यांनी जुलै 2022 मध्ये सदस्यत्व गमावले.
* प्रदीप चौधरी
हरियाणातील कालका येथील काँग्रेस आमदार जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या हल्ल्यात प्रदीप चौधरी दोषी ठरले. तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे.
* विक्रम सिंग सैनी
2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी खतौलीचे आमदार विक्रम सिंग सैनी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
* आशा राणी
मध्य प्रदेशातील बिजावर येथील भाजप आमदार आशा राणी यांना त्यांच्या मोलकरणीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 2013 मध्ये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
* सुरेश हाळवणकर
महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांना वीजचोरीप्रकरणी दोषी ठरल्यानंतर जून 2015 मध्ये अपात्र घोषित करण्यात आले होते.
* एनोस एक्का
शिक्षकाच्या हत्येप्रकरणी झारखंडमधील पक्षाच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा. 2014 मध्ये अपात्र ठरवण्यात आले आहे.
* बबनराव घोलप
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी महाराष्ट्रातील शिवसेना आमदार बबनराव घोलप यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 2014 मध्ये त्यांना आपली आमदारकी गमवावी लागली आहे.
* कमल किशोर भगत
झारखंडमधील लोहरदगा येथील आमदार कमल किशोर भगत हत्येप्रकरणी दोषी ठरले आणि जून 2015 मध्ये त्यांना अपात्र ठरवण्यात आले.