मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मानहानीच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांच्यावरील झालेल्या या कारवाईने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व विरोधी पक्षाकडून आंदोलन करत या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. अशातच पुण्यात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मानहानीच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे फडणवीस सरकारला घेरले आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.