मेघना गुलजारचा ‘राजी’ रिलीज होऊन आता तीन वर्षे होऊन गेली आहेत. “राजी’ हे काही या सिनेमाचे मूळ शीर्षक नव्हते, हे फारच कमी जणांना माहिती असेल. पण निर्माते सुभाष झा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये ही बाब सांगितली. हरिंदर सिक्का यांनी लिहिलेल्या “कॉलिंग सेहमत’ या पुस्तकावर “राजी’ची कथा आधारलेली असल्याने या सिनेमाचे शीर्षक देखील “सेहमत’ असेच ठरले होते.
“राजी’तील लीड रोल करणाऱ्या आलिया भट्टच्या व्यक्तिरेखेचे नावदेखील सेहमत असेच होते. स्क्रीप्टचे वाचन सुरू असताना मेघना गुलजारला त्यामध्ये काही बदल करावेसे वाटले. हरिंदर सिक्का यांच्या पुस्तकात सेहमत ही पाकिस्तान विरोधी मानसिकता असलेली तरुणी होती.
मात्र मेघना गुलजारने सेहमतला मानवतावादी व्यक्तिरेखा बनवले. मात्र, त्यामुळे पुस्तकाचा सूर हरपला जाऊ लागला. पाकिस्तानमध्ये हेरगिरी करणाऱ्या सेहमतला मानवतावादी दाखवताना मेघना गुलजारची दमछाक झाली. त्याच कारणामुळे सिनेमाचे शीर्षक “सेहमत’ न करता “राजी’ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच स्क्रीप्टवरच्या सिनेमाचे डायरेक्शन करण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी गुलजार यांच्याकडेही आला होता. मात्र, त्यावेळी ते शक्य झाले नाही.