“फ्रेंड्‌स रियुनियन’ सिरीयल पुन्हा सुरू होणार

“फ्रेंड्‌स रियुनियन’ ही गाजलेली मालिका नव्या एपिसोडसह पुन्हा सुरू होते आहे. नव्या सिझनचा पहिला एपिसोड 27 मे रोजी ब्रॉडकास्ट होणार आहे. बरोबर वर्षभरापूर्वी ही सिरीयल सुरू होण्याची घोषणा झाली होती. मात्र, अनेक कारणांमुळे ही सुरुवात होऊ शकलेली नव्हती. करोनाच्या शटडाऊनमुळे सिरीयलच्या प्रॉडक्‍शनमध्ये वारंवार खंड पडला होता. 

या सिरीयलच्या प्रॉडक्‍शनला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या प्रॉडक्‍शनच्या कामाला एप्रिलमध्ये सुरुवात झाली. मूळ कलाकारांपैकी जेनिफर ऍनिस्टन, कर्टनी कॉक्‍स, लिसा कुड्रो, मॅट लिब्लॅक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड स्च्विमर हे याहीवेळी कायम असणार आहेत. 

जेनिफर ऍनिस्टनने इन्स्टाग्रामवर “फ्रेंड्‌स…’चे ट्रेलर शेअर केले आहे. यावेळी डेव्हिड बेकॅहॅम, जस्टीन बिबर, जेम्स कॉर्डन, सिंडी क्रॉफर्ड, यांच्याबरोबर मलाला युसुफजाई हीदेखील पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. “फ्रेंड्‌स रियुनियन’चे प्रॉडक्‍शन वॉर्नर ब्रदर्सचे आहे. सहा दोस्तांची ही कथा प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे. या इंग्रजी मालिकेमुळे कित्येकांना “दिल, दोस्ती, दुनियादारी’ ची आठवण येऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.