Meera Manjhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर २०२३ रोजी विविध कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतील १० कोटी व्या लाभधारकाच्या घरी अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी त्या कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद घेतला. भेट घेतल्यानंतर मोदींनी आता त्या कुटुंबाला पत्र लिहिले असून घरातील लहान मुलांसाठी काही भेटवस्तू पाठवल्या आहेत.
30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी मीरा मांझी यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी चहाही घेतला. या भेटीचा व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये पीएम मोदी मीरा मांझी आणि त्यांच्या कुटुंबियांशी सरकारच्या गृहनिर्माण योजना आणि उज्ज्वला योजनेच्या फायद्यांविषयी बोलत होते. मीरा मांझी यांनी पीएम मोदींना सांगितले की, सरकारच्या या योजनांमुळे त्यांच्या कुटुंबाला डोक्यावर छप्पर आणि घरात गॅसची सुविधा मिळाली आहे. यानंतर आता पंतप्रधानांनी त्यांना पात्र लिहून काही वस्तू पाठवल्या आहेत. त्यासाठी मीरा मांझी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधानांकडे एक विनंती केली आहे.
अयोध्येतील मीरा मांझी यांनी पतीला नोकरी देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मोदींनी मीरा मांझी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पत्र लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी पत्रासोबत भेटवस्तूही पाठवल्या होत्या. आता मीरा मांझी यांनीही पतीच्या नोकरीसाठी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे.
मीरा मांझी यांनी, आपल्या मुलांचं भविष्य चांगलं असावं आणि त्यामुळे तिच्या नवऱ्याला नोकरी मिळावी अशी तिची इच्छा आहे. ते म्हणाले,”मुलांच्या स्कुल बॅग, पेन्सिल, टिफिन, हे सर्व पीएम मोदींनी पाठवलेल्या भेटवस्तूंमध्ये होते. आमच्या मुलांना खूप काही दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते. आता आमची एकच विनंती आहे की माझ्या पतीला कुठेही छोटीशी नोकरी द्यावी जेणेकरून त्यांचे भविष्य आमच्या मुलांसाठी सुधारेल. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की भविष्यात आपल्या मुलांचे भविष्य चांगले असावे.”अशी विनंती केली आहे.