Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांपेक्षा वैयक्तिक कारणामुळे अधिक करून चर्चेत आली आहे. सध्या इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तेथील सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इजिप्शियन पिरॅमिड्ससोबत शेअर केलेल्या सुंदर फोटोने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोनाक्षी सिन्हाने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या छायाचित्रांमध्ये सोनाक्षी इजिप्तच्या लोकप्रिय पिरॅमिडसोबत पोज देताना आणि तिचे फोटो क्लिक करताना दिसत आहे. सध्या तिचा हा चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. हे फोटो शेअर करत तिने “स्फिंक्स एकदम अप्रतिम दिसत होती, म्हणून मी तिला एक चुंबन दिले आणि नंतर काही फोटो देखील काढले,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाक्षी सिन्हा शेवटची ‘दहाड’मध्ये दिसली होती. ज्यामध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. दरम्यान, सोनाक्षीने मागील वर्षी सोशल मीडियाद्वारे मुंबईतील बांद्रा पश्चिम येथील शारदा ऑडिटोरियमच्या 81 ऑरेटमधील तिच्या आलिशान घराची झलक दाखवली. त्याच्या घरात चार मास्टर बेडरूम, लिव्हिंग रूम, ड्रेसिंग रूम, योगा एरिया, आर्ट स्टुडिओ आणि वॉक-इन वॉर्डरोबचा समावेश आहे. या अभिनेत्रीला तिचे आलिशान घर वास्तुविशारदाने डिझाईन केलेले 4 हजार स्क्वेअर फूटमध्ये मिळाले आहे.