पुणे, – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै.वा.गो.आपटे संदर्भ संशोधन ग्रंथालयात अखेरपर्यंत कार्यरत असणार्या ग्रंथसेवक मीनाक्षी विष्णू केळकर यांचे सोमवारी ( १९ फेब्रुवारी) निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे तीन भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे.
मसापच्या ग्रंथालयात ३२ वर्षे त्या कार्यरत होत्या. केळकर यांनी मराठी विषयात एम. ए. केले होते. मनोबोध या मनाच्या श्लोकांवर तसेच भगवतगीता, दासबोध, संत नामदेव, तुकाराम, एकनाथ यांच्या साहित्यावर त्यांनी अनेक परीक्षा त्यांनी दिल्या होत्या. वैष्णवी भक्ती मंडळामधील धार्मिक कार्यक्रमातही त्या नेहमीच सहभागी असत.