कोल्हापूर – शहरातील हेरिटेज वास्तूंचे लोकसहभागातून संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी प्राधान्याने दहा हेरिटेज वास्तूची यादी तयार करा अशा सुचना महापौर निलोफर आजरेकर यांनी दिल्या. महापालिका हद्दीतील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन व सुशोभिकरण करण्याच्या दृष्टिने आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडी, पदाधिकारी, हेरिटेज कमिटी व नगररचना विभाग यांची संयुक्त बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.
महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या कोल्हापूर शहर हे एक एैतिहासीक शहर आहे.या शहराला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेला आहे. या हेरिटेज वास्तूंचे लोकसहभागातून संवर्धन व सुशोभिकरण करा. यासाठी शहरातील सामाजीक संस्था, दानशूर व्यक्ती स्वत: खर्च करुन संवर्धन व सुशोभिकरण करण्यास तयार आहेत. या वास्तूंमधील प्राधान्यांने दहा वास्तूंची यादी दोन दिवसात तयार करुन सादर करा. हेरिटेज असलेल्या वास्तूंच्या परिसरातील होडिंग्ज काडून टाका. त्यामूळे त्या वास्तूंचे आडवे येणारे होडिंग्जमुळे विद्रुपींकरन होणार नाही.
हेरिटेज कमिटीने दोन दिवसात याबाबतचा अहवाल दयावा. टप्याटप्याने या वास्तूं सुशोभिकरण करा. शहरामध्ये येणा-या पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी या वास्तूंच्या परिसरात लाईट व साऊंड शो करा. हेरिटेज परिसरातील बांधकाम परवानगीचा अहवाल दया. हेरिटेज वास्तूंच्या ठिकाणी स्वच्छता, डागडूजी करा. शासन स्तरावर हेरिटेज वास्तूंबाबत निधीचा पाठपुरावा करा अशा सुचना केल्या.
स्थायी समिती सभापती सचिन पाटील म्हणाले हेरिटेज वास्तूंच्या परिसरात होर्डिग्ज उभे करण्यास परवाणगी देऊ नये. होर्डिग्ज उभे केल्यामुळे या परिसराचे विद्रुपीकरण होते. या एैतिहासीक वास्तूं जतन होणे गरजेचे आहे.
आयुक्त डॉ.कादबंरी बलकवडे म्हणाल्या हेरिटेज कमिटीने आत्तापर्यत काय काय केले याचा अहवाल दयावा. हेरिटेजच्या वास्तूंबाबत पुढील नियोजन काय करण्यात आले आहे त्याचे सादरीकरण करा. या बैठकीमध्ये सर्वानी मांडलेल्या सुचनावर आपले म्हणणे मांडण्यात यावे असे सांगितले.
प्रारंभी सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनी शहरातील हेरिटेज वास्तूंबाबतची माहिती दिली. शहरामध्ये एकूण 74 एैतिहासीक वास्तूंचे नोंद आहे. शहरामध्ये एैतिहासीक वास्तूंच्या तीन ग्रेड आहेत. ग्रेड ऐ मध्ये राष्ट्रिय तसेच स्थानिक अत्यंत महत्वाच्या वास्तूं , ग्रेड बी मध्ये स्थानिक दृष्टया महत्वाच्या वास्तूं , ग्रेड सी मध्ये स्थानिक दृष्टया महत्वाच्या परंतू अलीकडच्या काळातील वास्तूंचा समावेश आहे.
शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत म्हणाले महापालिकेच्या एैतिहासीक वास्तूंची स्वच्छता महापालिका स्वत: करते. शहरातील एैतिहासीक वास्तूं संवर्धन होणे गरजेचे आहे. यापुर्वी रंकाळा तलाव या एैतिहासीक वास्तूं संवर्धनासाठी महापालिका व शासन निधीतून खर्च करण्यात आलेला आहे. उर्वरीत संवर्धनासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, सभागृह नेता दिलीप पोवार, नगरसेवक भुपाल शेटे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, हेरिटेज कमिटी सदस्य व स्ट्रक्चरल ऑडिटर प्रशांत हडकर, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, आश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते.