पुणे शहरात नवीन 486 करोनाबाधित

27 जणांचा मृत्यू; 998 जण करोनामुक्‍त

 

पुणे – शहरात मंगळवारी नवीन 486 करोनाबाधित सापडले. मागील दोन दिवसांपासून बाधित संख्या पाचशेच्या आत आल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दिवसभरात 998 जण करोनामुक्‍त झाले आहेत. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

बाधितांच्या घटत्या संख्येमुळे सक्रिय बाधित आणि अत्यवस्थ बाधितांमध्येही घट झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी सतराशे ते अठराशेपर्यंत पोहोचलेली सक्रिय बाधित संख्या मंगळवारी 11 हजार 746 पर्यंत खाली आहे. तर त्यातील 833 बाधित हे अत्यवस्थ आहे.

450 जणांना व्हेंटीलेटर लावला आहे. तर, 383 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 2 हजार 501 जणांना ऑक्‍सिजन लावला आहे. शहरात दिवसभरात 4 हजार 90 जणांची नमुने तपासणी केली.

तर आतापर्यंत तब्बल 6 लाख 83 हजार 441 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 55 हजार 67 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील 1 लाख 39 हजार 450 बाधित करोनामुक्‍त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.