नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या मातोश्री रामरती यांचे काल दिल्लीत हदयाच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांच्याशी बोलून शोक व्यक्त केला.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मायावतींच्या दिल्लीतील त्यागराज मार्गावरील निवासस्थानी जाऊन तेथे अत्यंदर्शन घेतले तसेच त्यांनी मायावतींचे सांत्वनही केले.
सुमारे एक वर्षापुर्वी मायावती यांचे पिताश्री प्रभुदयाल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे. दरम्यान अन्य राजकीय नेत्यांनीही त्यांच्या मातोश्रींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.