नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवन याच्या जागी भरात असलेल्या मयंक अग्रवाल याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
येत्या रविवारपासून या मालिकेला प्रारंभ होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही निवड जाहीर केली. धवनला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याने निवड समितीने त्याच्या जागी मयंकला संघात स्थान दिले. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली.
त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरीही प्रत्यक्ष मैदानात उतरण्यासाठी तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही.
मयांक पदार्पण करणार भारताच्या एकदिवसीय संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मयंकला मिळाली आहे. अंतिम 11 खेळाडूंत जर मयंकला स्थान मिळाले तर तो पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळेल.