पुणे: बीव्हीबी, मुंबई बॉईज, एसपीएम, नालंदा हायस्कूल संघांनी सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
17 वर्षांखालील मुलांच्या लढतीमध्ये बीव्हीबी संघाने न्यू लाईफ स्पोर्टस् क्लब संघाला 25-12, 25-23 असे पराभूत करताना विजयी सलामी दिली.
मुंबई बॉईज संघाने मिलेनियम स्कूल संघाला 25-9, 25-15 असे पराभूत करताना विजय साकारला. सिम्बायोसिस संघाने नालंदा हायस्कूल संघाला 25-9, 25-21 असे पराभूत करताना विजयी सलामी दिली. सिम्बायोसिस संघाने केएचएस संघाला 25-15, 25-9 असे पराभूत करतना विजयी सलामी दिली.
एसपीएम संघाने बालशिक्षण संघाला 25-18, 21-25, 13-15 असे पराभूत करताना विजय साकारला. मिलेनियम स्कूल संघाने भारती विद्या भवन संघाला 25-11, 25-19 अये पराभूत केले. नालंदा हायस्कूल संघाने एसपीएम इंग्लिश स्कूल संघाला 25-17, 25-24 असे पराभूत करताना विजयी सलामी दिली. जी. जी. शाह स्कूल संघाने केएचएस संघाला 25-14, 25-15 असे पराभूत केले.