मुंबई – मुंबई पुन्हा एकदा इमारतीला आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. कांजूरमार्ग परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. ही आग इतकी मोठी आहे की, आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आज (रविवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
कांजूरमार्ग पूर्व येथील कर्वे नगर परिसरात असलेल्या एमएमआरडीएच्या 14 मजली इमारतीला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल!
इमारतीच्या जिन्यावर धूर पसरल्याने पायऱ्या दिसत नव्हत्या. त्यामुळे अनेक लोक इमारतीमध्ये अडकले होते. तसंच धुराचे प्रमाण जास्त असल्याने लोकांना श्वास घेण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. यात या इमारतीमधील 5 महिलांचा श्वास गुदमरला. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.