नवी दिल्ली- शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाल्यामुळे, दिल्ली सरकारने बुधवारी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे. तथापि दिल्लीतील शाळा इतक्यात बंद करण्याची गरज नाही असे मत आपत्ती व्यवस्थापन समितीने व्यक्त केले आहे
त्यामुळे शाळांच्या बाबतीतील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना सामाजिक मेळाव्यावर बारीक लक्ष ठेवण्यास आणि दिल्लीतील चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. काल मंगळावारी दिल्लीतील कोविड प्रकरणांमध्ये 26 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. बुधवारी दिल्लीत कोविडचे एकूण 632 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील पॉझिटीव्हीटी रेट 4.42 टक्के इतका नोंदवला गेला आहे.