नोएडा (उत्तर प्रदेश)- उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर पोलिसांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरावरील बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल जिल्ह्यातील सुमारे 900 धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.
या जिल्ह्यातील 621 पैकी 602 मंदिरे, 268 पैकी 265 मशिदी, 16 अन्य धार्मिक स्थळे तसेच 182 पैकी 175 डीजे चालकांना नोटिसा दिल्या आहेत.
या सर्वांना ध्वनिवर्धक लावण्याच्या संबंधात जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. या सुचनांचे पालन केले नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी या नोटीशीद्वारे दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर आणि सकाळी 6 वाजण्यापुर्वी कोठेही लाऊडस्पीकर लावण्यास अनुमती नाही. आणि अन्य वेळी तो लावल्यास त्याचा आवाज अत्यंत मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.