लग्नाचा बहाणा करून महिलेला परदेशात विकले; आईने ‘अशी’ केली सुटका

सातार्‍यातील महिलेची तक्रार

मिरज येथील चौघांवर गुन्हा

सातारा : लग्न लावून परदेशात गेल्यानंतर आपल्याला पाच लाखाला केवळ कामासाठी विकल्याचे समजताच सातार्‍यातील महिलेने परदेशातील एका महिलेच्या मदतीने आपली सुटका करून ती सातार्‍यात सुखरुप परतली. संबंधित महिलेचा विश्वासघात करून तिला विकणाºया सांगली जिल्ह्यातील मिरज येथील चौघांवर तसेच तिला विकत घेणाऱ्या बहरिन देशातील एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

समीर बादशहा नदाफ, हमत बादशहा नदाफ, आरिफा बादशहा नदाफ, महम्मद शेख (रा. नदीवेस शास्त्री चौक परिसर, मिरज, जि. सांगली), अब्दुलहुसेन अली इब्राहिम ( बहरिन देश),  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पीडितेचा विवाह २००३ मध्ये झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. मात्र, काही वर्षांनतर या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर  पीडिता आपल्या मुलांसोबत मिरज येथेच स्वतंत्र राहू लागल्या. त्यांच्या भावजयीच्या घराजवळ राहणार्‍या समीर नदाफ, त्याची आई राहमत, बहीण आरिफा व तिचा पती महम्मद हे सर्वजण तिच्या घरात आले. त्यांनी सांगितले.

आईने पाठविले विमानाचे तिकिट..
बहरिन देशातील एका महिलेच्या मोबाईलवरून  पीडितेने  सातार्‍यात आईला फोन केला. हा सारा प्रकार आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने बहरिन येथे राहणार्‍या संबंधित महिलेच्या मोबाईलवर विमानाचे तिकिट पाठविले.  त्या महिलेच्या मदतीने पीडिता  ही २३ जुलै २०१९ रोजी गुपचुपणे बहरिनमधून अबुधाबी येथून मुंबईत आली. त्यानंतर ती सातार्‍यात सुखरुप पोहोचली. प्रकृती बरी नसल्यामुळे तिला तक्रार देण्यास उशीर झाला. सातार्‍यात औषधोपचार घेतल्यानंतर पीडितेने समीर नदाफ व इतरांना फोन केला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तुम्ही माझी फसवणूक केली आहे, असे तिने सांगताच संबंधितांनी तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

महम्मद शेख यांचा बहरिन देशातील मित्र अब्दुलहुसेन अलि इब्राहिम यांची पत्नी मयत झाली असून त्याचा दुसरा विवाह करायचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला पीडिता आवडली आहे. तो तिचा मुलांसह स्वीकार करेल. दुसऱ्या लग्नाची चर्चा करण्यासाठी पीडिता  ही भावजयीसोबत साताऱ्यात आली. घरातल्यांशी चर्चा केल्यानंतर नदाफ कुटुंबीयांना साताºयात बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांनी अब्दुलहुसेन हा बहरिन येथे पुढच्या आठवड्यात जाणार आहे. त्यापूर्वीच त्याचे लग्न करायचे आहे. तो चांगला असून आम्ही हमी देतो, असे त्यांनी पीडितेला सांगितले. त्यामुळे तिने लग्नास संमती दर्शवली.

२४ मार्च २०१९ रोजी पीडितेचे अब्दुलहुसेन याच्याशी सातार्‍यात लग्न झाले. लग्नानंतर तिचा पासपोर्ट व विजा नसल्याने पीडितेला मिरज येथील समीर नदाफ याच्या घरी राहण्यासाठी नेले. तेथे गेल्यानंतर समीरच्या घरी न नेता दुसरीकडे नेले. पाच दिवसांनंतर अब्दुलहुसेन याने पीडितेला सातार्‍यात आईकडे आणून सोडले. त्यानंतर तो बहरिनला निघून गेला. काही दिवसांनंतर पीडितेला त्यांनी विजा पाठवून दिला. १ जुलै २०१९ रोजी पीडिता एकटीच विमानाने बहरिनला गेली. तेथे गेल्यानंतर अब्दुलहुसेन याने तिला घरी नेले. घरात गेल्यानंतर तेथे अगोदरच तीन महिला होत्या. त्यांची भाषा पीडितेला समजत नव्हती.

दोन दिवसांनंतर अब्दुलहुसेन इब्राहिम याने पीडितेला कामासाठी बाहेर नेले. तेथील ऊन सहन होत नसल्याने पीडितेने कामास नकार दिला. त्यावेळी अब्दुलहुसेन याने ‘तुला मी पाच लाख रुपयांना समीर व त्यांच्या नातेवाईकांकडून विकत घेतले आहे. त्यामुळे तुला काम करावेच लागेल,’ असे त्याने सांगितले. आपल्याला लग्नाचा बहाणा करून विकले असल्याचे पीडितेला समजल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here